प्रास्ताविक : चतु:सूत्रीमधील एका सूत्राकडे लक्ष वेधणारे पुस्तक

विज्ञानाने मला काय दिले? हे ऑडिओबुक गौरी देशपांडे यांच्या आवाजात 'स्टोरीटेल'वर आले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारकार्यातून अंनिसची चतुःसूत्री आकाराला आली होती. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. त्यातील दुसरे सूत्र समोर ठेवून, डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 'विज्ञानाने मला काय दिले?' या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक काढला होता, पुढे तो पुस्तकरूपाने प्रकाशित झाला.

ज्यांचे औपचारिक शिक्षण विज्ञानशाखेत झालेले आहे आणि जे या ना त्या प्रकारे उपयोजित विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत होते किंवा आहेत, अशा विविध क्षेत्रांतील (38 ते 85 वयोगटातील) 12 मान्यवरांचे लेख या पुस्तकात आहेत. 

हे ऑडिओबुक ऐकून, विज्ञान ही मूलतः विचारपद्धती आहे आणि मानवजातीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तिचा अंगिकार जास्तीत जास्त झाला पाहिजे, असेच चित्र पुढे येईल. 'कर्तव्य'वर आजपासून दर गुरुवारी एका लेखाचा ऑडिओ याप्रमाणे 13 आठवड्यांत हे ऑडिओबुक सादर करीत आहोत.


विज्ञानाने मला काय दिले? हे ऑडिओबुक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

विज्ञानाने मला काय दिले?हे पुस्तक छापील स्वरूपात खरेदी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

Tags:Load More Tags

Comments:

प्रकाश खटावकर, सातारा

Very good effort of spreading thoughts on science of dr. Narendra Dabholkar, satara. Good to hear on storytel

Add Comment