सुरेश भट

तारांगण : 5/16

साधना साप्ताहिकात तारांगण या सदरातून 2011 मध्ये सुरेश द्वादशीवार यांनी 16 व्यक्तींविषयी लिहिलेले ललितरम्य आणि विचारगम्य लेख त्याच वर्षाच्या अखेरीस पुस्तकरूपाने आले. या पुस्तकाच्या चार आवृत्त्या आजवर प्रसिद्ध झाल्या आहेत.
हे लेख म्हणजे केवळ व्यक्तिचित्रे नाहीत, अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी आणि अगोदर हाती आलेल्या काही उत्तरांविषयी संशय उत्पन्न करणारी चित्रणे आहेत. यातील काही व्यक्तिरेखांची महाराष्ट्राला ओळख नाही, काहींची ओळख अपुरी तर काहींची ओळख गैरसमजांनी झाकोळलेली आहे..
अशा या पुस्तकाचे एकूण 10 तासांचे ऑडिओबुक स्टोरीटेलवर आले आहे. ज्येष्ठ नाट्य-अभिनेते गजानन परांजपे यांनी या ऑडिओबुकसाठी वाचन केले आहे.
ऑडिओ स्वरूपातील हे 16 लेख आठवड्यातून दोन याप्रमाणे 'कर्तव्य साधना'वरून सादर करत आहोत.. 


 

हे पुस्तक छापील / इ-बुक / ऑडिओबुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी भेट द्या sadhanaprakashan.in ला... 

 

Tags: मराठी गझल सुरेश भट तारांगण गजानन परांजपे ऑडिओ सुरेश द्वादशीवार audio suresh bhat suresh dwadashiwar marathi poet Load More Tags

Comments:

संजय मेश्राम

सुरेश द्वादशीवार हे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते. त्याच काळात सुरेश भट हे वि. सा. संघातील निवडणुका, संकुलाचे रेंगाळलेले बांधकाम आदी विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडत असत. हा संदर्भ या लेखात आला असता, तर लेख परिपूर्ण झाला असता.

विश्वास पेंडसे.

ऐकत रहाव अस....आपली आँडिओ टेप संपूच नये इतक छान वाचन देखील.

Add Comment