बापट आणि प्रधान एकमेकांचे ‘वादी-संवादी’

'ग. प्र. प्रधान : व्यक्ती आणि साहित्य' या चर्चासत्राचे बीजभाषण

साधना साप्ताहिकाचे भूतपूर्व संपादक प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साधना ट्रस्ट आणि साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ऑक्टोबर 2023 ला एस. एम. जोशी फाउंडेशन, पुणे येथे दिवसभराचे चर्चासत्र झाले. 'ग. प्र. प्रधान : व्यक्ती आणि साहित्य' या विषयावरचे हे चर्चासत्र होते. सकाळी 10.30 ते 5 या वेळेत झालेल्या या चर्चासत्रातील चार सत्रांमध्ये एकूण 15 वक्त्यांनी प्रधान आणि त्यांचे साहित्य या विषयावर आपले विचार मांडले.

या चर्चासत्राचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग 'साधना'च्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेच; मात्र त्यातील निवडक भाषणे स्वतंत्र व्हिडिओच्या स्वरूपात कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रामध्ये बीजभाषण विनय हर्डीकर यांनी केले. आपल्या 30 मिनिटांच्या भाषणात त्यांनी प्रधान आणि बापट यांच्या मूळ प्रेरणा एकच असल्या तरी व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण कसे होते याकडे लक्ष वेधले.


या संपूर्ण चर्चासत्राचा सविस्तर वृतांत येथे वाचा.

Tags: vinay hardikar vasant bapat symposium sane guruji marathi literature prof g p pradhan sahitya academy साहित्यिक चर्चासत्र बापट प्रधान साने गुरुजी Load More Tags

Add Comment

संबंधित लेख