ऑडिओ - विचक्षण विलक्षण विनायक

साधना साप्ताहिकाच्या दिवाळी अंकातील हा दीर्घलेख आता लेखकाच्याच आवाजात 'स्टोरीटेल'वर उपलब्ध आहे. 

1920 ते 1995 असे 75 वर्षांचे आयुष्य लाभलेले, वि. म. दांडेकर हे भारतातील नामवंत अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेती, सहकार, लोकसंख्या, गरिबी, लघुद्योग, अन्नधान्य समस्या, शेतीविषयक कायदे इत्यादी विषयांवर अनेक पुस्तके व शोधनिबंध लिहिले. त्यांनी 'पॉव्हर्टी इन इंडिया' हे डॉ. नीळकंठ रथ यांच्याबरोबर लिहिलेले पुस्तक विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष संपले तेव्हा, विनय हर्डीकर यांनी लिहिलेला दीर्घ लेख साप्ताहिक साधनाच्या 2021 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. हर्डीकर यांना दांडेकर यांचा जो दीर्घकाळ सहवास लाभला त्यावर आधारित हा लेख असून, यातून हर्डीकर व दांडेकर या दोघांचेही व्यक्तिमत्त्व उभे राहते. खरे तर हा लेख म्हणजे हर्डीकर यांनी दांडेकर यांना लिहिलेले दीर्घ पत्र आहे. मुळात हे रेकॉर्डिंग आधी करण्यात आले आणि नंतर त्याचे शब्दांकन करून लेख तयार केला गेला. साधना साप्ताहिकाच्या अर्काईव्हवर हा लेख उपलब्ध आहे. 

हा संपूर्ण लेख आता Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. संपूर्ण ऑडियो बुक पावणेतीन तासांचे असून त्यातील 12 मिनिटांचा भाग इथे सादर करीत आहोत.

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: वि. म. दांडेकर पा. वा. सुखात्मे स्टोरीटेल ऑडीओ Load More Tags

Add Comment