मेरा नकाब कहाँ है!

बाभळीच्या बाया : झरी - जामणी तालुक्यात : भाग 5/19

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.

या पुस्तकात 18 लेख आहेत:

सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.

हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग ऐकता येईल. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते.

2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील.

आज त्याचा पाचवा भाग प्रसिद्ध करत आहोत :

प्रकरण चौथे - मेरा नकाब कहाँ है! (13 मिनिटांचा ऑडिओ)

"मला शिवणकाम नव्हे, तर ब्यूटी पार्लरमधलं काम शिकायचं आहे, असं लेखिकेला हक्काने सांगणारी, ते काम मान लावून शिकणारी, घरची जबाबदारी आणि पुरुषवर्चस्व असलेलं कुटुंब सांभाळतानाच प्रक्षिणाच्या ठिकाणी मात्र एक माणूस म्हणून मुक्त आणि बिनधास्त मनाने वावरणारी, मनमोकळी नगमा या प्रकरणात भेटते. तिचा प्रवास चौकटीतला असला तरी एकेक पाऊल ठामपणे पुढे नेणारा आणि आनंददायक आहे.

 

Tags: पुणे विद्यापीठ एम ए नकाब बुरखा झरी-जामणी यवतमाळ csr tiss वनश्री वनकर गौरी देशपांडे सामाजिक स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांचे अनुभव स्त्री स्वातंत्र्य पुरुषसत्ता Load More Tags

Add Comment