महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.
या पुस्तकात 18 लेख आहेत:
सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.
हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग ऐकता येईल. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते.
2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील.
आज त्याचा चौथा भाग प्रसिद्ध करत आहोत :
प्रकरण तिसरे - आमचा 'आपला दिवस'
सुरुवातीचे पूर्वग्रह आणि अवघडलेपणा कमी होऊन स्थानिक बायांनी गावातील आरोग्यविषयक कामाचे प्रशिक्षण कसे पूर्ण केले, लेखिकेबरोबर आणि आपापसांत त्यांचे कसे खेळीमेळीचे नाते निर्माण होत गेले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात कशी झाली, याचा अनुभव या भागात आहे.
हा 16 मिनिटांचा ऑडिओ आहे.
Tags: बाया csr समाजकार्य समाज स्त्रिया आदिवासी प्रशिक्षण संवितरीबई फुले झरी-जामणी यवतमाळ गौरी देशपांडे अभिवाचन Load More Tags
Add Comment