प्रिया - संध्या

 

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.

या पुस्तकात 18 लेख आहेत: सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.

हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग ऐकता येईल. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते.

2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील. आज त्याचा सहावा भाग प्रसिद्ध करत आहोत.

प्रकरण पाचवे - प्रिया - संध्या
प्रियाताई आणि संध्याताई या गावच्या लेकी.

दोघींनाही पितृसत्ताक व्यवस्थेचा फटका बसलेला होता. प्रियाताईंच्या नवऱ्याचं निधन झाल्यावर त्यांना सासरच्यांनी मुलासह माहेरी पाठवून दिलं. आणि संध्याताईंना प्रेमविवाह केला म्हणून सासरच्यांनी स्वीकारलं नाही, म्हणून त्यांनी माहेरच्या गावी परत येऊन नवऱ्यासह संसार थाटला. त्यांना गावात काम मिळू नये, गावच्या सुनांना अर्थार्जनाची संधि मिळावी म्हणूनगवणे विरोध केला. त्यावर या दोघींनी काशीमत केली, आत्मविश्वास आणि निर्धाराने काम कसे केले याची कहाणी या भागात आहे.

हा 20 मिनिटांचा ऑडिओ आहे.

Tags: बाभळीच्या बाया स्त्रीवाद पितृसत्ता समाजकार्य आदिवासी झरी-जामणी यवतमाळ csr वनश्री वनकर गौरी देशपांडे स्त्रिया शिक्षण आशा जनजागृती Load More Tags

Add Comment