आशावादी सपना

बाभळीच्या बाया : झरी - जामणी तालुक्यात : भाग 10 /19

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.

या पुस्तकात 18 लेख आहेत: सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.

हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग ऐकता येईल.

2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील. आज त्याचा सातवा भाग प्रसिद्ध करत आहोत.

प्रकरण नववे - आशावादी सपना
पोरवयात झालेल्या पहिल्या लग्नात लवकरच आलेलं वैधव्य, 15 वर्षांनी मोठ्या व दारूचं व्यसन असलेल्या माणसाशी झालेलं दुसरं लग्न, पदरातलं मूल, घरातली अवहेलना आणि न सुटणारी गरीबी या संगळ्यांशी सामना करत प्रशिक्षण घेत सुपरवायझर झालेली सपना, गावातल्या बचतगटाच्या कामात आत्मविश्वासाने कामच नव्हे तर करून नफ्याचा व्यवसाय उभा करणारी आणि त्यासाठी पुरस्कार मिळवणारी सपना, आपल्या मुलाच्या आधी आपण बारावी व्हावं, पदवी मिळवावी अशी आस लागलेली सपना. तिची धमक दाखवणारी ही गोष्ट.

हा 15 मिनिटांचा ऑडिओ आहे.

Tags: संवितरीबई फुले csr यवतमाळ झरी-जामणी वनश्री वनकर गौरी देशपांडे बाया शिक्षण स्त्री शिक्षण प्रौढ शिक्षण आत्मभान आत्मविश्वास चिवटपणा झुंज संघर्ष पितृसत्ता Load More Tags

Add Comment