पदर

बाभळीच्या बाया : झरी - जामणी तालुक्यात : भाग 12 /19

 

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.

या पुस्तकात 18 लेख आहेत: सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.

हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग ऐकता येईल.

2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील. आज त्याचा बारावा भाग प्रसिद्ध करत आहोत.

प्रकरण अकरावे - पदर
आपल्याच गावातल्या लहानशा हॉटेलात कधी पाऊलही न ठेवलेल्या बाया सगळ्या मिळून हॉटेलात गेल्या, आत्मविश्वासाने तिथल्या पुरुषांशी बोलल्या, तरुण मुलांना उठवून जागा करून घेऊन बसल्या, ऑर्डर दिली, खाल्लं, हिशोब केले, आणि इतकंच नव्हे तर हे सगळं करताना घरातसुद्धा कायम डोक्यावरून पदर घेणारी मंदोदरी ताई नकळतपणे डोक्यावरचा पदर काढून, तो कमरेला खोचून वावरायला लागली. तिची लांबसडक वेणी पहिल्यांदाच दिसली. आत्मविश्वास आणि मोकळेपणा यांची ही वेगळीच गोष्ट!

हा 16 मिनिटांचा ऑडिओ आहे.

Tags: मंदोदरी आत्मविश्वास शिक्षण आर्थिक स्वातंत्र्य पितृसत्ता गौरी देशपांडे झरी-जामणी यवतमाळ साधना डिजिटल Load More Tags

Add Comment