सरपंचीणबाई

बाभळीच्या बाया : झरी - जामणी तालुक्यात : भाग 15/19

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.

या पुस्तकात 18 लेख आहेत: सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.

हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग येथे ऐकता येईल.

2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील. या मालिकेतील सर्व भाग एकापाठोपाठ एक येथे ऐकता येतील.

आज त्याचा पंधरावा भाग प्रसिद्ध करत आहोत. 
प्रकरण चौदावे - गाव-भूगोल-जात-आरोग्य (34 मिनिटांचा ऑडिओ)
गावाच्या राजकारणात स्त्रियांचे स्थान आणि त्यांच्या पदाला मिळणारा मान हे सारेच दुय्यम असते. बाई सरपंच होते, पण सत्ता तिच्या नवऱ्याची चालते, असं चित्र अनेकदा अनुभवाला येतं. यामागची पितृसत्ताक आणि पुरुषवर्चस्ववादी सामाजिक मानसिकता  या प्रकरणात चर्चेला घेतली तसेच यावर मत करून, किंवा तीच व्यवस्था थोडी वाळवून सरपंच म्हणून प्रभावशाली असलेल्या स्त्रियांचीदेखील ओळख लेखिकेने यात करून दिली आहे.

Tags: सरपंच महिला सरपंच पितृसत्ता महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण राजकारणातील महिला झरी-जामणी यवतमाळ गौरी देशपांडे वनश्री वनकर सीएसआर csr समाजकार्य आदिवासी सावित्रीबाई फुले मुक्ता साळवे Load More Tags

Add Comment