फॉर्म नंबर 17 

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.

या पुस्तकात 18 लेख आहेत: सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.

हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग ऐकता येईल. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते.

2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील. आज त्याचा सातवा भाग प्रसिद्ध करत आहोत.

प्रकरण सहावे - फॉर्म नंबर 17

कामाचे प्रशिक्षण आणि गावात जाऊन काम करता करता वनश्रीबरोबर काम करणाऱ्या बायांना स्वतःहोऊन शिक्षणाचे महत्त्व जाणवले. ज्यांची दहावी / बारावी झालेली नव्हती. त्यांनी अभ्यास करून परीक्षा देण्याचनिरणे घेतला,अभ्यास केला, परीक्षा दिली आणि पास होऊन काही जणींनी पुढील शिक्षणाची वाट धरली.

हा 20 मिनिटांचा ऑडिओ आहे.

Tags: वनश्री वनकर गौरी देशपांडे साधना डिजिटल स्त्रिया बाया शिक्षण दहावी-बारावी परीक्षा उच्च शिक्षण प्रौढ शिक्षण स्त्रीवाद सावित्रीबाई फुले मुक्ता साळवे Load More Tags

Add Comment