रंग वसंताचे - भाग 1 

वसंत बापटांच्या निवडक 33 कवितांचे त्यांच्याच आवाजातील सादरीकरण

1922 ते 2002 असे ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभलेल्या वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष 25 जुलै 2021 रोजी सुरु होत आहे. प्रामुख्याने कवी अशी त्यांची ओळख. त्यांनी कवितेमध्ये विविध प्रकार हाताळले. लावणी, पोवाडा, प्रेमकविता, निसर्गकविता, देशभक्तीपर कविता इत्यादी. त्यातील निवडक 33 कवितांचे त्यांच्याच आवाजातील सादरीकरण 1993 मध्ये साधना प्रकाशनाने 'रंग वसंताचे' या शीर्षकाखाली रेकॉर्ड केले होते. हे रेकॉर्डिंग ऑडिओ कॅसेट्सच्या स्वरुपात दोन भागांत प्रकाशित झाले होते. मात्र या कॅसेट्स आता उपलब्ध नसल्यामुळे त्या सर्व 33 कवितांचे डिजिटायजेशन करून त्या YouTube च्या माध्यमातून कर्तव्य साधनावर दोन भागांमध्ये उपलब्ध करून देत आहोत. (त्यापैकी पहिल्या कवितेला कोरस संगीता बापट यांनी दिला आहे.) त्यातील 59 मिनिटांच्या या पहिल्या भागात एकूण 14 कविता आहेत...

1. जय अंबे जगदंबे 
2. स्वातंत्र्य? कुठे स्वातंत्र्य? 
3. बिजली नाचेल गगनात 
4. दख्खनची राणी 
5. रंगाने तू गव्हाळ
6. नाजूक रुपडे 
7. सेतू 
8. केवळ माझा सह्यकडा 
9. फुंकर 
10. विस्मृती 
11. आज अचानक 
12. प्रियंवदा 
13. जिना
14. मुंबैच्या मनकर्णिके

Tags: Weekly Sadhana Kartavya Sadhana Vasant Bapat Marathi Marathi Poems Rang Vasantache Marathi Songs साधना साप्ताहिक कर्तव्य साधना वसंत बापट मराठी मराठी कविता मराठी गाणी रंग वसंताचे रंग वसंताचे - भाग 1 Rang Vasantache - Part 1 Load More Tags

Comments: Show All Comments

Deepak Bhojraj

Can anyone. Post two poems here नागासाकीचे अंध व झेलमचचे अश्रु Thanks Deepak Bhojraj.

Hira

'बिजली नाचेल गगनात' कविता वाचतानाचा सरांचा आवेश अजूनही साक्षात डोळ्यांसमोर दिसतो आहे.पुढे मी शिक्षिका झाल्यावर बारावीच्या पाठ्यक्रमात फुंकर कवितेचा समावेश झालेला होता.ती कविता बरीच वर्षं मी शिकवली; अतिशय समरसून शिकवली.

अनुया अहिरे

अतिशय दुर्मिळ दुर्लभ खजिना हाता त ठेवल्याबद्दल कर्तव्यसाधनाचे आभार मानावे तितके थोडेच!हरवत चाललेले मराठी शब्द ऐकुन समाधान वाटले. राजकीय व सामाजिक कवितात वर्णिलेली स्थिती आज तरी कुठे बदलली आहे?कालातीत साहित्य!

रोहन सुरेश डहाळे

ह्या अत्यंत प्रतिकूल काळात बापट काकांच्या शब्दातील राष्ट्र सेवा दलाच्या विचारांची आज प्रचंड गरज आहे .. मनातले समोर आलें. साधनेचे धन्यवाद ..साने गुरुजी आरोग्य मंदिर संस्था, सांताक्रुझ .

Tara Marathe

खुप खुप धन्यवाद

Madhuzende

Maitra ho khatarjama ..poem is his favourite poem. Is it included in the list. If not please make it available in his voice.

Add Comment