किशोर कदम (सौमित्र) यांनी सादर केलेल्या वसंत बापट यांच्या सात कविता

'वसंत बापट : व्यक्ती आणि साहित्य' या चर्चासत्रातील कवितावाचन

साधना साप्ताहिकाचे भूतपूर्व संपादक कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साधना ट्रस्ट आणि साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ऑक्टोबर 2023 ला एस. एम. जोशी फाउंडेशन, पुणे येथे दिवसभराचे चर्चासत्र झाले. 'वसंत बापट : व्यक्ती आणि साहित्य' या विषयावरचे हे चर्चासत्र होते. सकाळी 10.30 ते 5 या वेळेत झालेल्या या चर्चासत्रातील चार सत्रांमध्ये एकूण 15 वक्त्यांनी बापट आणि त्यांचे साहित्य या विषयावर आपले विचार मांडले. या चर्चासत्राचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग 'साधना'च्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेच; मात्र त्यातील निवडक भाषणे स्वतंत्र व्हिडिओच्या स्वरूपात कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत.

'वसंत बापट यांची कविता' या विषयावरील पहिल्या सत्रात किशोर कदम (कवी सौमित्र) यांनी बापटांच्या आमंत्रण, तुला नव्या जगाची आण, कुंपण (बालकविता), बाभूळझाड यांसह त्यांना भावलेल्या एकूण सात कविता सादर केल्या. त्यांनी सादर केलेली, सेतू या संग्रहात समाविष्ट असणारी 'फुंकर' ही कविता श्रोत्यांची विशेष दाद मिळवून गेली..


या संपूर्ण चर्चासत्राचा सविस्तर वृतांत येथे वाचा.

Tags: marathi poetry vasant bapart saumitra recitation literature sahitya साहित्य कविता वसंत बापट साहित्य अकादमी कविता वाचन गारवा कुंपण बालकविता बाभूळझाड Load More Tags

Comments:

Rajendra Tiwari

खुप छान कविता आणि तेवढाच छान उपक्रम आणि किशोर कदम तर बोलायलाच नको.... अप्रतिम.... धन्यवाद साधना ...

Add Comment

संबंधित लेख