वसंत बहार : वसंत बापट यांच्यावरील माहितीपट

वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी समाप्तीनिमित्त पुणे येथे या माहितीपटाचे उद्घाटन झाले.

मराठीच्या नामवंत प्राध्यापक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्ष अशी ओळख असलेल्या माधवी वैद्य यांनी अनेक चांगल्या माहितीपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यामध्ये वसंत बापट यांच्यावर केलेला एक तासाचा माहितीपटही लक्षणीय आहे. याची संकल्पना आणि संगीत राहुल घोरपडे यांचे आहे. निर्मिती आणि प्रस्तुती, अनुक्रमे 'अक्षरवेध' आणि 'आर्या कम्युनिकेशन्स अँड व्हिडिओज, पुणे' यांची आहे.

1996 मध्ये तयार केलेला तो माहितीपट संक्षिप्त करून (23 मिनिटांचा), 23 जुलै 2022 रोजी यूट्युबवर आला आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन त्या दिवशी विनय हर्डीकर यांच्या हस्ते झाले. वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी समाप्तीनिमित्त, पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन यांनी आयोजित केलेल्या त्या कार्यक्रमात माधवी वैद्य व संतोष पद्माकर पवार हे दोन प्रमुख वक्ते होते. 

https://youtu.be/fYO6z9lyG7E या लिंकवर तो माहितीपट पाहता येईल. त्या कार्यक्रमात झालेली विनय हर्डीकर, माधवी वैद्य आणि संतोष पद्माकर पवार या तिघांची भाषणे असलेले व्हिडिओ साधना साप्ताहिकाच्या यूट्युब चॅनेलवर पाहता येतील.

(माधवी वैद्य यांनी मराठीतील एकूण 13 कवींवर 'कवी शब्दांचे ईश्वर' ही माहितीपटांची मालिका केली असून, ते सर्व त्यांच्या यूट्युब चॅनेलवर उपलब्ध करून दिले जात आहेत. Aarya Communications and Videos किंवा 'कवी शब्दांचे ईश्वर' असे सर्च करून आपल्याला त्या माहितीपटांपर्यंत पोचता येईल. इंदिरा संत, आरती प्रभू, ग्रेस, शांता शेळके, वसंत बापट यांच्यावरील माहितीपट त्या चॅनेलवर आले असून, पुढील काही महिन्यांत उर्वरित माहितीपटही उपलब्ध होणार आहेत.)

 

Tags: माहितीपट माधवी वैद्य मराठी साहित्यिक मराठी भाषा कविता कवी मराठी कविता वसंत बापट Load More Tags

Add Comment

संबंधित लेख