झेलम परांजपे यांनी वसंत बापट यांच्या दोन रचनांवर सादर केलेला नृत्याविष्कार

'वसंत बापट : व्यक्ती आणि साहित्य' या चर्चासत्राचा समारोप

साधना साप्ताहिकाचे भूतपूर्व संपादक कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साधना ट्रस्ट आणि साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ऑक्टोबर 2023 ला एस. एम. जोशी फाउंडेशन, पुणे येथे दिवसभराचे चर्चासत्र झाले. 'वसंत बापट : व्यक्ती आणि साहित्य' या विषयावरचे हे चर्चासत्र होते. सकाळी 10.30 ते 5 या वेळेत झालेल्या या चर्चासत्रातील चार सत्रांमध्ये एकूण 15 वक्त्यांनी बापट आणि त्यांचे साहित्य या विषयावर आपले विचार मांडले. या चर्चासत्राचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग 'साधना'च्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेच; मात्र त्यातील निवडक भाषणे स्वतंत्र व्हिडिओच्या स्वरूपात कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत.

या चर्चासत्राच्या समारोपाच्या सत्रात ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे यांनी 'व्यक्ती म्हणून वसंतकाकांचा माझ्यावर काय प्रभाव पडला' याविषयी सुरुवातीची 15 मिनिटे मनोगत व्यक्त केले आणि त्यानंतर बापटांच्या रचनांवर दोन नृत्याविष्कार सादर केले. गीता दत्त यांनी गायलेली 'जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला' ही रचना व 'अकरावी दिशा' या काव्यसंग्रहातील 'उमा' ही संगीतिका यांवरील हे ओडिसी शैलीतील नृत्याविष्कार होते.


या संपूर्ण चर्चासत्राचा सविस्तर वृतांत येथे वाचा.

Tags: ओडिसी वसंत बापट शास्त्रीय नृत्य झेलम परांजपे सदानंद वर्दे सेवादल कलापथक कविता मराठी साहित्य साहित्य अकादमी चर्चासत्र Load More Tags

Add Comment

संबंधित लेख