पुण्यश्लोक रे आणि डॉ. दया कृष्ण

असेही विद्वान (भाग 2/20)

मराठीतील महत्त्वाच्या नियतकालिकांचे संपादक, साहित्याचे समीक्षक आणि सौंदर्यशास्त्राचे भाष्यकार अशी ओळख असलेल्या प्रभाकर पाध्ये (1909 ते 1984) यांचे असेही विद्वान हे पुस्तक आता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध झाले आहे. त्यासाठी वाचन केले आहे गजानन परांजपे यांनी.. हे एकूण 20 ऑडिओज् आठवड्यातून दोन याप्रमाणे कर्तव्यवर प्रसिद्ध करत आहोत. प्रत्येक ऑडिओ 10 ते 20 मिनिटांच्या दरम्यान असून त्यात दोन किंवा तीन विद्वानांविषयीचे प्रसंग आहेत. वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकात एकूण 75 लेखांचे भारतातील विद्वान (33), आशियायी विद्वान (20) व पाश्चात्त्य विद्वान (22) असे तीन विभाग केले आहेत. क्रमवारी लावताना मात्र तसा काहीही विचार केलेला नाही. कारण या आठवणी इतक्या विविध प्रकारच्या आहेत की, त्या सर्व काहीएक सूत्रात पकडता येणे अवघड आहे. विद्वान व्यक्तींच्या विक्षिप्तपणाचे किंवा वैशिष्ट्यपूर्ण वर्तनाचे हे प्रसंग ऐकताना त्या-त्या विद्वानांविषयी असलेले गूढ कमी होईल; या विद्वान व्यक्तीसुद्धा मानवी भाव-भावना, इच्छा-आकांक्षा असलेल्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवेल आणि असे असूनही त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देता आले याची जाणीव होऊन आपल्या मनातील या विद्वानांविषयीचा आदर निश्चितपणे वाढेल!


डॉ. दया कृष्ण यांच्याविषयी...

डॉ. दया कृष्ण (1924 - 2007)

तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दया कृष्ण यांनी भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या तुलनात्मक अभ्यासातून तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात नव्या दिशा शोधल्या. असे म्हणतात की, त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यांच्या पीएच.डी. प्रबंधापासूनच पाहायला मिळाली होती. डॉ. दया कृष्ण हे 'जर्नल ऑफ इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च'चे संपादकसुद्धा होते. निवृत्तीनंतरसुद्धा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या दया कृष्ण यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून अभ्यासक, विद्यार्थी आणि संशोधक नियमितपणे यायचे.


पुण्यश्लोक रे हे तत्त्वज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते, यापलीकडे त्यांच्याविषयी फारसे तपशील अन्यत्र आढळले नाहीत. मात्र त्यांच्याविषयीचा मार्मिक प्रसंग पाध्ये यांनी नोंदवला आहे. 


हे पुस्तक छापील किंवा इ-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.  

 

Tags: marathi audio book prabhakar padhye gajanan paranjape asehi vidwan sadhana prakashan sankalp gurjar Load More Tags

Comments:

दीपक पाटील

खूप सुंदर श्रवणीय आनंद. दोन महान तत्त्वज्ञांची ओळख झाली. अशा महनीय व्यक्तींबद्दल समाजात माहिती व्हावी यासाठी साधना खूप छान योगदान देते आहे. साधना चा उद्देश... जो साने गुरुजींना अपेक्षित होता तसेच घडते आहे.

Add Comment