क्षणचित्रे : 'श्यामची आई' या सिनेमातील कलाकारांची मुलाखत व नव्या आवृत्तीचे प्रकाशन 

स्थळ : टिळक स्मारक मंदिर, पुणे | तारीख : 3 नोव्हेंबर 2023

1933 मध्ये नाशिक येथील तुरुंगात असताना साने गुरुजींनी फक्त पाच दिवसांत लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकाने मागील नऊ दशकांत महाराष्ट्रातील प्रत्येक पिढीवर प्रभाव टाकलेला आहे, आतापर्यंत या पुस्तकाच्या काही लाख प्रती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या आहेत.या पुस्तकावर आधारित आचार्य अत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपट 1953 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला राष्ट्रपतींचे पहिले सुवर्णकमळही मिळाले, गेली 70 वर्षे त्या चित्रपटानेही मराठी मनावर गारूड केले आहे..

मात्र श्यामची आई या पुस्तकातून साने गुरुजींनी कथन केलेली मूल्ये कालातीत आहेत, हे नव्या पद्धतीने दाखवणारा सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई हा नवा मराठी चित्रपट येत्या 10 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपटही जाणीवपूर्वक ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे. त्या निमित्ताने, या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याशी संवाद आणि श्यामची आई या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन यासाठी साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन यांनी 3 नोव्हेंबर 2023 रोजी टिळक स्मारक मंदिर येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. 

त्या कार्यक्रमातील ही काही क्षणचित्रे :या कार्यक्रमात ज्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले त्या पुस्तकात श्यामची आई या नव्या सिनेमातील 35 छायाचित्रे त्या त्या प्रसंगांच्या ठिकाणी समाविष्ट केली आहेत, मुखपृष्ठावरही सिनेमातील श्यामच्या कुटुंबाचे छायाचित्र आहे. उत्तम कागद व आकर्षक छपाई असलेली ही हार्डबाऊंड आवृत्ती आहे..निमित्त कोणतेही असो वा नसो, कोणीही कोणालाही भेट द्यावी अशी ही आवृत्ती झाली आहे...

श्यामची आई या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर, ई बुक स्वरूपात किंडलवर तसेच 'साधना मिडिया सेंटर'मध्ये उपलब्ध आहे. 


या कार्यक्रमाचा व्हिडिओ :

 

Tags: श्यामची आई साने गुरुजी चित्रपट सुजय डहाके सुनील सुकथनकर शर्व गाडगीळ गौरी देशपांडे shyamchi aai new marathi film Load More Tags

Add Comment