2005 मध्ये माहितीचा अधिकार देणारा कायदा अस्तित्वात आला, त्याला आता वीस वर्षे पूर्ण होत आहेत. या कायद्याच्या प्रणेत्या अरुणा रॉय आणि त्यांचे सहकारी यांनी लिहिलेल्या "द आरटीआय स्टोरी" या पुस्तकाचा मराठी अनुवाद "कहाणी माहिती अधिकाराची" य नावाने 2020 मध्ये साधना प्रकाशनाकडून आलेला आहे. शिवाय, त्यांच्या त्या कार्यावर आधारित "दलपतसिंग येती गावा" या नाटकावरील विशेष अंक साधना साप्ताहिकाने 2010 मध्ये काढला होता.
या पार्श्वभूमीवर, गेल्या महिन्यात अरुणा रॉय व निखिल डे पुणे शहरात येणार होते तेव्हा त्यांची मुलाखत अच्युत गोडबोले यांनी साधना कार्यालयात घ्यावी, असे ठरवले होते. मात्र वेळेअभावी त्यात बदल करून, ती मुलाखत सोलापूर येथे घेण्यात आली. अर्ध्या तासाची ही व्हिडिओ मुलाखत, जुन्या विषयावर नव्याने प्रकाश टाकणारी आहे.
- संपादक
kartavyasadhana@gmail.com
Tags: आर टी आय माहिती अधिकार अरुणा रॉय निखिल डे अच्युत गोडबोले Load More Tags
Add Comment