कर्तव्य पॉडकास्ट - लोकबिरादरी प्रकल्पाची नेलगुंडा येथील शाळा

समीक्षा गोडसे यांच्याशी ऐश्वर्या रेवडकर यांनी साधलेला संवाद..

डॉ. प्रकाश व डॉ.मंदा आमटे यांनी गेली 50 वर्षे लोकबिरादरी प्रकल्पाच्या अंतर्गत पायाभूत म्हणावे असे काम चालू ठेवले आहे. त्यांनी सुरू केलेल्या नेलगुंडा या शाळेच्या संदर्भात एक छोटा लेख यापूर्वी 'साधना'त (प्रमोद मुनघाटे यांनी लिहिलेला) प्रसिद्ध झालेला आहे आणि नेलगुंडा शाळेतील मुलांची मुंबई सहल हा लेख समीक्षा गोडसे यांनी 'कर्तव्य साधना'साठी दोन वर्षांपूर्वी लिहिला आहे. समीक्षा गोडसे या हेमकलसा लोक बिरादरी प्रकल्पाच्या शिक्षण विभागाच्या समन्वयक. त्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रयोगांमुळे नेलगुंडाच्या साधना विद्यालयाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्या शाळेच्या संदर्भात त्यांची मुलाखत विचाराधीन होती. गेल्या आठवड्यात डॉ. ऐश्वर्या रेवडकर (‘विजापूर डायरी’मुळे साधना वाचकांना माहीत झालेली) आणि समीक्षा यांची साधना कार्यालयात भेट झाली तेव्हा समीक्षा यांच्या एकूण कामाबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा अशा स्वरुपाची एक मुलाखत ऑडिओ स्वरूपात करावी आणि कर्तव्यवर प्रसिद्ध करावी असे ठरले. तीच ही मुलाखत..

ही मुलाखत झाली तेव्हा त्यातील अंतर्गत सूत्र, साधनाच्या 3 सप्टेंबरच्या मिनी विशेषांकाला पूरक आहे असे वाटले. म्हणून त्या मुलाखतीचे शब्दांकन करून ती त्या अंकात घेतली आहे. (ती मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) अर्थातच, ही मुलाखत एक झलक आहे. या शाळेच्या आणि एकूणच त्या शिक्षण प्रयोगाच्या संदर्भात अधिक सखोल व अधिक विस्तृत असे प्रसिद्ध करता येणे शक्य आहे.


हेही ऐका : आदिवासी भागात होत असलेले सकारात्मक बदल नोंदवायचे होते. - डॉ. ऐश्वर्या रेवडकर

Tags: लोकबिरादरी आदिवासी शाळा शिक्षक दिन शिक्षण प्रकाश बाबा आमटे साधना विद्यालय Load More Tags

Add Comment