13 जुलै : माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची साधना कार्यालयाला भेट

माजी न्यायमूर्ती व वर्ध्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी 13 जुलै 2023 रोजी साधना कार्यालयाला सपत्नीक भेट दिली. यावेळी त्यांच्या अनौपचारिक भेटीसाठी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, मुकुंद टाकसाळे, संध्या टाकसाळे, माजी न्या. जी. डी. पारेख, 'मनोविकास प्रकाशन'चे अरविंद पाटकर, 'रोहन प्रकाशन'चे प्रदीप चंपानेरकर व 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.