डॉ. दिलीप शिंदे यांनी गेल्या 2010 ते 2020 च्या दशकात साधना साप्ताहिकातून 'रुग्णानुबंध' आणि 'चिखलाचे पाय' या दोन लेखमाला लिहिल्या, नंतर त्यांची पुस्तकेही आली. त्याच काळात त्यांच्या मनात 'संवेदना सेवा-शुश्रूषा केंद्र' सुरू करण्याचे बीज पडले. अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची आस्थापूर्वक सेवाशुश्रूषा ही भूमिका उराशी बाळगून त्यांनी हे केंद्र 2016 मध्ये सांगली येथे सुरू केले. त्या केंद्राला आता दहा वर्षे झाली आहेत आणि ते उत्तम प्रकारे चालू आहे. या दहा वर्षांतील अनुभवांवर आधारित पुस्तक 'मावळतीचे आकाश' या नावाने साधना प्रकाशन कडून आले आहे. 1 जुलै (डॉक्टर्स डे ) 2026 रोजी, ते प्रकाशित झाले.
गेली दहा वर्षे संवेदना शुश्रूषा केंद्राच्या माध्यमातून जराजर्जर झालेल्या ज्येष्ठांची सेवाशुश्रूषा करत असताना, त्यांच्यापैकी काहींचे मृत्यू डॉक्टरांनी जवळून पाहिले आहेत. प्रत्येकाचा मृत्यू व त्याला सामोरे जाण्याची पद्धत कशी निराळी होती आणि क्षणाक्षणाला त्यांची भावस्थिती कशी बदलत होती ते त्यांनी अनुभवले आहे.
‘प्रेम उपेक्षू नका, आयुष्याकडे दुर्लक्ष करू नका, आनंदाने जगायला शिका, सहजीवनात समजूतदारपणा दाखवा, संवादनाते जपा, चांगुलपणावर भरवसा ठेवा व आपण सर्वजण मर्त्य आहोत याची सतत जाणीव ठेवा.’ अशा जीवन समृद्ध आणि समाधानी करण्याच्या अनेक गोष्टी या ज्येष्ठांच्याकडून शिकायला मिळाल्याचे त्यांनी पुस्तकात सांगितले आहे. मावळतीच्या संधिप्रकाशाप्रमाणे मृत्युसमयीचे त्यांचे व्यक्त-अव्यक्त बोल वाचकांपर्यंत पोहोचविले तर त्यांच्या जगण्याचे भानही नक्कीच थोडे अधिक प्रगल्भ होईल, या भावनेने ही पुस्तक लिहिलेले आहे असे डॉ. शिंदे कार्यकत्रमंत म्हणाले.
पुस्तकातील अनुभव, आशय आणि अशा प्रकारच्या संवेदनशील हॉस्पिसची आजच्या समाजात असलेली गरज, या विषयावर कार्यक्रमात भाषणे झाली. त्या संपूर्ण कार्यक्रमाचा हा दोन तास आठ मिनिटांचा व्हिडिओ आहे.
मावळतीचे आकाश (संवेदना सेवा-शुश्रूषा केंद्रातील अनुभव)
लेखक : डॉ. दिलीप शिंदे
हस्ते : मा. दीपक करंजीकर
आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन तज्ज्ञ, लेखक व अभिनेते
अध्यक्ष : मा. डॉ. नरेंद्र वैद्य
अध्यक्ष, आस्था फाउंडेशन औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर
प्रमुख उपस्थिती :
डॉ. माधुरी माने
उपाध्यक्ष, संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट
विनोद शिरसाठ
संपादक, साधना प्रकाशन
वेळ : बुधवार, दिनांक 1 जुलै 2026 सायंकाळी 4.30 वाजता
स्थळ : श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, नेमिनाथनगर, सांगली
Tags: sadhana weekly mavaltiche akash geriatrics geriatric care hospice हॉस्पिस संवेदना रुग्णसेवा वृद्धसेवा वृद्धाश्रम सेवा शुश्रूषा care giver care care economy Load More Tags
Add Comment