अच्युत व तारा दाभोलकर या दाम्पत्याला दहा अपत्ये झाली. सात मुले व तीन मुली. सर्वांत मोठे देवदत्त तर सर्वांत लहान नरेंद्र. हे सर्वजण साताऱ्यातील १५५ सदाशिव पेठ या घरात लहानाचे मोठे झाले. या दहा भावंडांच्या सोबतच अच्युतरावांच्या भावाच्या दोन मुलीही त्याच घरात वाढल्या. ही सर्वच भावंडे वृत्तीने स्वतंत्र आणि आपापल्या क्षेत्रात कर्तबगार ठरली. त्यातील काहींनी वेळप्रसंगी स्वतःविषयी, भावंडांविषयी व कुटुंबाविषयी लेख लिहिले. काही आप्तस्वकीयांनीही त्यांच्याविषयी लेख लिहिले. अशा निवडक अठ्ठावीस लेखांचे पुस्तक १५५ सदाशिव पेठ, सातारा : लोकविलक्षण दाभोलकर कुटुंबाची कथा या नावाने साधना प्रकाशनाकडून आले आहे. भानू काळे व अनिल जोशी यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन 20 मे 2026 रोजी सातारा येथे डॉ. ज्ञानदेव म्हस्के (कुलगुरू, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ) यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता दामोदर नायक (लेखक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते) होते.
या कार्यक्रमात साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले, आणि पुस्तकाचे दोन्ही संपादक भानू काळे व डॉ. अनिल जोशी, यांनी या पुस्तकाच्या संपादनामागची भूमिका मांडली. प्राचार्य अरुण आंधळे यांची विशेष उपस्थिती होते. शिरीष चिटणीस यांनीही आपले विचार मांडले.पुस्तकाच्या दोन्ही संपादकांनी पुस्तक संपादित करण्यामागची भूमिका मांडली. त्या व्यतिरिक्त, दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. शैला दाभोलकर आणि शिरीष चिटणीस यांनी मनोगते व्यक्त केली. वर्षा काळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शशिकला शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीचे निवेदन बाबुराव शिंदे यांनी केले.
त्या संपूर्ण कार्यक्रमाचा हा अडीच तासांचा व्हिडिओ आहे.
Tags: सातारा १५५ सदाशिव पेठ सातारा दाभोलकर दत्तप्रसाद दाभोळकर शैला दाभोलकर नरेंद्र दाभोलकर नवे पुस्तक पुस्तक प्रकाशन साधना प्रकाशन Load More Tags
Add Comment