व्हिडिओ - मी पाहिलेले प्रधान मास्तर...

पन्नालाल सुराणा यांनी ग. प्र. प्रधान यांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला दृष्टिक्षेप

26 ऑगस्ट 1922 ते 29 मे 2010 असे 88 वर्षांचे आयुष्य लाभले, त्या ग. प्र. प्रधान यांचे जन्मशताब्दी वर्ष 26 ऑगस्ट 2021 रोजी सुरू होत आहे. 1942च्या 'चले जाव' चळवळीत भूमिगत कार्य करून नंतर दोन वर्षे तुरुंगवास, स्वातंत्र्यानंतर पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात 20 वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक, त्यानंतर 18 वर्षे विधान परिषदेचे सदस्य (त्यातील दोन वर्षे विरोधी पक्षनेते) आणि मग 14 वर्षे वसंत बापट यांच्यासह साधना साप्ताहिकाचे संपादक अशी त्यांची कारकिर्द होती.

तब्बल सहा दशके ग. प्र. प्रधान यांचा सहवास ज्यांना लाभला ते ज्येष्ठ समाजवादी नेते आणि राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांनी प्रधान सरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला दृष्टिक्षेप... मी पाहिलेले प्रधान मास्तर!


साधना प्रकाशनाकडून आलेली ग. प्र. प्रधान यांची तीन महत्त्वपूर्ण पुस्तके साधना मिडिया सेंटरसोबतच Amazon वरही उपलब्ध असून ती खरेदी करण्यासाठी क्लिक करा :

माझी वाटचाल 

स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत

लोकमान्य टिळक - पेपरबॅक  हार्डकवर

Tags: Sadhana Saptahik Weekly Sadhana Kartavya Sadhana Marathi साधना साप्ताहिक कर्तव्य साधना मराठी Vinod Shirsath विनोद शिरसाठ G. P. Pradhan ग. प्र. प्रधान गणेश प्रभाकर प्रधान Ganesh Prabhakar Pradhan Pannalal Surana पन्नालाल सुराणा Load More Tags

Add Comment