ऑडिओ : झुंडीच्या सुस्थिर श्रद्धा आणि अस्थिर समजुती 

'झुंडीचे मानसशास्त्र' हे पुस्तक आता स्टोरीटेलवर उपलब्ध

वाचावे कसे हे शिकवण्यासाठी 'नवी क्षितिजे' हे त्रैमासिक दीर्घकाळ चालवणाऱ्या आणि थोडेच पण विशेष महत्त्वाचे गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेले 'झुंडीचे मानसशास्त्र' हे पुस्तक 'द क्राउड' आणि 'द ट्रू बिलिव्हर' या दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर आधारित आहे. विश्वास पाटील यांनी ती दोन पुस्तके अनुक्रमे 'झुंडी' आणि 'सच्चा अनुयायी' या स्वरूपात  सुबोध मराठीत आणली, आणि 'झुंडीचे मानसशास्त्र' हे एकसंध पुस्तक तयार केले. साधना प्रकाशनाचे हे पुस्तक आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर (storytel) आले असून, ओंकार गोवर्धन यांनी त्याचे वाचन केले आहे. पंधरा तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, मात्र त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. त्यातील हा चौदा मिनिटांचा भाग. 


'झुंडीचे मानसशास्त्र' हे पुस्तक  Storytel वर ऐकण्यासाठी क्लिक करा - 

1. झुंडी

2. सच्चा अनुयायी


साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: मराठी ऑडिओबुक स्टोरीटेल विश्वास पाटील ओंकार गोवर्धन झुंडीचे मानसशास्त्र Marathi Marathi Books Audiobooks Audio books Zundiche Manasshastra Vishwas Patil Omkar Govardhan Sadhana Prakashan Storytel Load More Tags

Add Comment